Dr. Kamathe Piles Hospital

Marquee Stop on Hover
Cashless Facility Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

Email us at

info@doctorpile.com

Contact us

+91-8888866185

मुळव्याध रोगासाठी योगाभ्यास 

मुळव्याध जर टाळायचा असेल तर त्यासाठी योगा करणे फायद्याचे असते. काही उपयुक्त योगासने खालीलप्रमाणे –

 

१.’मंडूकासन’

  मंडूक हा एक संस्कृत शब्द असून याचा अर्थ बेडूक असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बेडका प्रमाणे दिसतो. म्हणून, या आसनाला ‘मंडूकासन’ असे म्हणतात. या आसनाला इंग्रजी मध्ये “फ्रॉग पोझ” (Frog Pose) म्हणतात. हे आसन आपल्या पोटच्या आतील अवयवांसाठी तसेच पोटाच्या भवती वाढलेली चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच या आसनाच्या सरावामुळे पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो.

 

२.शशांकासन

तणावावर मात करण्यासाठी हेआसन महत्त्वपूर्ण ठरू शकतं, ते आहे शशांकासन. ताण-तणाव, चिडचिडेपण यात हे आसन विशेष लाभदायक आहे. आमाशय, यकृत, स्वादुपिंड, किडनी, आतडी यांना हे आसन बळ देतं. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, भूक न लागणे, अपचन, मधुमेह या विकारांत हे आसन फायद्याचं ठरतं.

 

३. गोमुखासन

गोमुख याचा अर्थ गाईचे तोंड. या आसनात साधकाच्या पायांची रचना गाईच्या मुखासारखी, तर पाऊले तिच्या कानांसारखी भासतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात.. हे आसन संवर्धनात्मक आसनांमध्ये मोडते.ह्या आसनामध्ये पाठीच्या कण्याचा वरचा भाग, फुप्फुसे, कटिप्रदेश व गुडघे यांवर चांगले परिणाम होतात. या आसनामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. मानेच्या मणक्यांचा त्रास व पाठदुखी असल्यास हे आसन उपयोगी ठरते.

 

४. वक्रासन 

 वक्र म्हणजे(शरीराचा वरचा भाग) वळविलेला किंवा पीळ दिल्याप्रमाणे डावीकडे किंवा उजवीकडे फिरविलेला(असतो). या आसनात मेरुदंडास पीळ दिला जातो, म्हणून या आसनास ‘वक्रासन’ असे म्हणतात. मत्स्येंद्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन ही आसने करायला कठीण आहेत. पाठीच्या कण्याला वळविण्याचा सराव व्हावा, त्याची लवचिकता वाढावी(म्हणून हे आसन उपयुक्त ठरते).

 

५. पवनमुक्तासन

पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी एक सर्वोत्तम आसन म्हणजे ‘पवनमुक्तासन’. पवन म्हणजे वायू या आसनामुळे आपल्या पोटातील सर्व वायू सहजरित्या बाहेर पडतो म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात. महिलांसाठी सुद्धा हे आसन फार उपयुक्त आहे. कारण, या आसनाच्या सरावामुळे गर्भाशयाशी संबंधित असलेले आजार दूर होतात.

 

६.  ‘पादांगुष्ठनासास्पर्शासन’

पोटाचे स्नायू मजबूत करणाऱ्या ‘पादांगुष्ठनासास्पर्शासन’(पादांगुष्ठनासास्पर्शासनामुळे पोटाचे स्त्रायू मजबूत होतात). या आसनामुळे कंबर, पाठ आणि मानेचे स्नायू लवचीक होतात. पायांमध्येही लवचीकता येते. शरीराला हलकेपणा येतो. त्याबरोबरच पचनशक्ती सक्रिय होण्यास मदत होते. या आसनाचा आणखी एक फायदा म्हणजे पुढे आलेली नाभी जागेवर आणण्यास हे आसन उपयुक्त ठरतं. किडनी, यकृत, आतडी, स्वादुपिंड, मलाशय, मूत्राशय हे सगळे अवयव चांगल्या प्रकारे काम करू लागतात. हे आसन करत राहिल्यानं बद्धकोष्ठता, गॅस, भूक न लागणं आणि लठ्ठपणा यामध्ये लाभ होतो.

 

७. उत्तानपादासन

उत्तानपादासन हे आसन पोटाचा थुलथुलीतपणा दूर करून लठ्ठपणाला अटकाव करतं. हे आसन करण्यामुळे पोटाच्या अवतीभवतीच्या स्नायूंना मजबुती मिळते. मजबूत स्नायूंमुळे पचनशक्ती वाढते. पचनशक्ती चांगली असेल तर बद्धकोष्ठ, गॅस, ढेकर येणं, अपचन, भूक न लागणं हे पोटाशी संबंधित विकार बरे होण्यास मदत होते. बेंबी योग्य जागी राहण्यात हे आसन सहाय्यकारी ठरतं. हे आसन करत राहिल्यानं हृदय, फुफ्फुस कार्यक्षम होतात. कमी रक्तदाब, शरीराला, मनाला जाणवणारी सुस्ती यामध्येही हे आसन फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील पीटीका, पुटकुळ्या यांना अटकाव करण्यात सहाय्यभूत ठरणारं हे आसन असून, त्यामुळे चेहऱ्यावरचा तजेला कायम राहतो. केस गळणं, केस पांढरे होणं या गोष्टी थांबवण्यातही या आसनामुळे मदत होते.

 

८. नौकासन

नौकासन पोटावर केले जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण योगासन आहे. या आसनात शरीराचा आकार नावेसारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन म्हटले जाते. वजन : यामुळे संपूर्ण शरीराचे वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण करून पाहिजे तशी आकृती मिळवू शकता. पाठीचा कणा: पाठीच्या कण्यासाठी हा फायदेशीर आहे.त्याच बरोबर : प्राणायाम म्हणजे प्राणाचे किंवा श्वासाचे आयाम किंवा विस्तार. प्राणायम हा योगाचा एक भाग असून, यामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती आहेत. योग्य व शास्त्रीय पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दूर करतो. योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतो व आपले शरीर आणि मन संतुलित करतो.Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

EN_US
Scroll to Top