मुळव्याधीची लक्षण ही तशी वेदनादायक असतात. संडास ला जाताना आग होणे,जागा दु:खणे ,पोट साफ न होणे. खाज सुटणे अशा प्रकारची लक्षणे घेऊन पेशंट हा त्रास अंगावर काढत असतो. पुरुषांमध्ये या आजाराविषयी काही प्रमाणात जागरुकता आहे. परंतु स्त्रिया हा आजार कुणाला सांगत नाही. किंवा कोणत्या डॉक्टरांकडून ही याच्यावर उपचार घेत नाही त्यामुळे या आजारांची लक्षणे दिवसेंदिवस वाढत जातात. पहिला तर आजच्या कलियुगामधे त्याची बरीच कारणे आहेत.1) आजची धावपळ धकाधकीचा जीवनशैली
2) बैठेकाम
3) व्यायामाचा अभाव
4) खूप तिखट खाणे
5) वेळेवर झोप नसणे
6) मोठ्या प्रमाणात रेचक औषधे घेणे
7) अती कडक आसनावर बसणे
8) बाहेरचे अन्नपदार्थ खाणे
9) अति मांसाहार
10) वंश परंपरागत
11) गरोदरपणात या शिवाय अनेक कारणामुळे मुळव्याध होत असतो. परंतु मुळव्याधची ही प्रमुख कारणे आहेत.
मुळव्याध या विषयी आयुर्वेदात आचार्य सुश्रुत,चरक ,वाग्भट यांनी खूप सांगितले आहे. हजारो वर्षांपूर्वी सुश्रुतांनी या आजाराविषयी तसेच उपचारांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आजही त्यांना father of surgery असे संबोधले जाते.
इ. स. 1700साली इजिनचे पापायरस यांनी आरग्वाधाच्या पानांची क्रिम तयार करुन मुळव्याधीवर लावले जात होते. ‘हिप्पोक्रेटस’ यांना रबर बॅन्ड लायगेशन म्हणजेच मुळव्याधीचे कोंब एक विशिष्ट पद्धतीने बांधणे ही पद्धती विकसित झाल्यानंतर वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया विकसित केली ट्रान्सफिक्स ही उपचारपद्धती अतिशय प्रचलित झाली आणि आज ही आहे ‘बायबल’ सारख्या पवित्रग्रंथात देखिल मुळव्याधाचे वर्णन आहे.
फक्त लोकांमधे मुळव्याध हा आजार माहित आहे.
संडासच्या जागेच्या आजारामधे 1)मुळव्याध -(अर्श, कोंब)त्यामधे ही प्रकार आहेत. त्यामधे ही प्रकार आहेत.
1) बाहेरचा मुळव्याध
बाहेरचा मुळव्याध गुदाच्या जागी बाहेरच्या बाजूला कोंब आतला लागत असतो. लक्षणे :-संडासच्या जागे वेदना होणे, आणि कधी तरी टोचल्या सारखे वाटणे
2) आतला मुळव्याध
आतला मुळव्याध:- संडासला कडक झाल्यामुळे आतल्या रक्तवाहीन्यांवर दाब आल्यामुळे आतला मुळव्याध किंवा आतला कोंब तयार होता असतो. लक्षणे:-संडास नंतर रक्त पडणे,मांसल भाग हाताला लागणे ,संडासच्या जागी आग होणे ,संडासची जागा दुखणे .
3) फिशर
संडासला कडक होऊन संडासच्या जागी जखम होते किंवा तेथील त्वचा फाटली जाते त्यास फिशर असे म्हणतात. लक्षणे:-संडासच्या वेळी आग होणे टोघल्यासारखे वाटणे ,कापल्याप्रमाणे वेदना होणे नियमित किंवा केव्हातरी थेंब थेंब रक्त पडणे.
4) फिस्टुला
गाठेत पु तयार होणे गाठ फुटल्यावर बरे वाटणे सतत रक्त व पु मिश्रित चिकट स्त्राव होणे, वेदना असणे नसणे याशिवाय गुदगत ग्रंथी गुदकडू, नाडीप्रण हेही गुदगत आजार होतात. मुळव्याधामध्ये अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आहे. इंजेक्शन थेरपी, लेझर थेरपी, क्षारसुत्र, क्षारकर्म थेरपी, रबर बॅड लायगेशन थेरपी, इन्फ्रारेड इ. थेरपी आहे.
आशा अनेक प्रकारची ट्रिटमेंट आहे शौचाच्या ठिकाणी कोणत्याही त्रास झाला तर मुळव्याध झाला असे वाटते वास्तविक पाहाता गुदभागी होणार्या आजारांनमधे फिशर ,भगंदर , विद्रधी, कण्डू, पुढे कॅन्सर पर्यंत आजार होतात. परंतु अतिशय वेदनादायक हा आजार आसतो.
या आजारामुळे अनेक नामवंत खेळाडूंना आंतराष्ट्रीय खेळांपासून मुकावे लागले अनेक प्रतिष्ठीत व्यक्तिना त्याच्या अनेक स्पर्धांपासून मागार घ्यावी लागली यामुळे अमेरिका व इतर देशांनी पुढाकार घेऊन 20 नोव्हेंबर रोजी जागतीक मुळव्याध दिन घोषित केला.
या दिवशी सर्वांनी शपथ घ्यावी की मुळव्याधमुक्त भारत होण्यास स्वतःची व कुटुंबाची योग्य काळजी आम्ही घेऊ योग्य आहार आयुर्वेदानुसार पालन करू दुध, तुप, ताक, पालेभाज्या, फळभाज्या यांचे सेवन करून मुळव्याधी पासून दूर राहू.