आयुर्वेद शास्त्राचा भक्कम पाया व त्यावर आधारित इतर सव॔ आरोग्य चिकित्सा पध्दती हे आपल्या “महान भारतीय संस्कृतीने ” संपुण॔ विश्वाला दिलेला अनमोल ठेवा आहे.
वास्तविक संपुण॔ विश्वात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक आरोग्य चिकित्सा पध्दतीचे “मुळ” हे आपले भारतीय आयुर्वेद शास्त्र आहे.
अनेक वर्षापासून व पिढ्यानपिढ्या चालत आलेली उपचार पद्धती म्हणजे “आयुर्वेद” होय.आपले पुव॔॔ज आयुष्याची “शंभरी” पार करायचे.त्यांनाही जीवनात “आजार” होतेच की फक्त फरक हा होता की “त्यावेळी पुव॔जांनी अवलंबलेली निसर्गाशी समरस होऊन जगण्याची रीत व नैसर्गिक उपचार पद्धती “.
आज संपूर्ण जगात “काहीही आजार नसलेला व पुण॔तः निरोगी” असा मनुष्य शोधूनही सापडणे कठीणच झालेय.. असे का ? याचा जर आपण विचार व अभ्यास केला तर त्याचे एकमेव कारण म्हणजे “आपली बदललेली जीवनशैली” हेच होय.
आपला आहार-विहार हा जर नैसर्गिक असला तर आपली जीवनशैली नक्कीच उत्तमोत्तम होईल.पण आताच्या इंटरनेट व रासायनिक युगात लोकांना “नैसर्गिक आहार-विहार” मिळणार कसा ? असा प्रश्न पडणे रास्तच आहे. परंतु त्यातही आपण शक्य तेवढे नैसर्गिकरीत्या उत्पन्न केलेले अन्न,कमी प्रमाणात किंवा शक्यतो रासायनिक खतांचा वापर नसलेले अन्नधान्य, दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिणे, जास्तीत जास्त पौष्टिक अन्न घेणे,ॠतूमानानुसार मिळणाऱ्या भाज्या व फळे,यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करणे,शक्यतो जेवण व झोपेच्या वेळा निश्चित करून वेळच्या वेळी त्याप्रमाणे नियोजन आचरणात आणणे, जास्तीतजास्त शारिरीक कष्ट होईल व नियमीत व्यायामपध्दती ( येथे आपल्या शारिरीक क्षमतेला योग्य आहे ती व्यायामपध्दती अपेक्षित आहे ) आजारपणात नैसर्गिक उपचार व आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश करणे अशा लहान -लहान गोष्टी व कृती यांचा समावेश जर आपल्या जीवनशैलीत काटेकोरपणे केला तर त्याचा नक्कीच चांगला प्रभाव पडून आपले आयुष्यमान सुधारेल व जे काही जीवन आपण जगतो ते आनंदी व आरोग्यदायी होईल.
“आरोग्यम् धनसंपदा हेच सुखी व आनंदी जीवनाचे ब्रीद आहे.” म्हणून आपल्या आरोग्यदायी व आनंदी जीवनप्रवासासाठी जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जावून, जीवनशैलीत थोडासा बदल करूयात व हा नववर्षाचा आणि आरोग्यदायी जीवनाचा संकल्प प्रत्यक्षात अंमलात आणूयात….