"प्रकृती" म्हणजे We Care...We Cure... !"

we care we cure

सामान्यतः नावात काय आहे? असं म्हणतात. पण जर थोडासा विचार केला तर आपण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक वस्तू, गोष्टी, विचार, भावना अशा जवळपास सव॔ दृष्य व अदृष्यांना एका विशिष्ट नावानेच ओळखतो किंवा एका विशिष्ट नावाने "त्याची सामान्यतः माहिती समजते", म्हणजे नाव असल्यामागे अनेक भावना, विशेषत्व, त्यामागील उद्देश, ध्येय, काय॔ पद्धती, इत्यादीची कल्पना व साधारण जाणीव होते.यास अनुसरूनच साधारणतः १२-१३ वर्षापुर्वी "प्रकृती" या नावाने आयुर्वेदिक उपचार केंद्र "कोंढवा बु.पुणे" येथे सुरू केले.त्यानंतर या केंद्रातमाफ॔त आजवर जवळपास १९५०० पेक्षा अधिक व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करून एक आरोग्यदायी व आनंदी जीवनप्रवासासाठी सहकार्य व माग॔दश॔न केले आहे.

या केंद्रामार्फत आयुर्वेद उपचार,"यात क्षारसुत्र, क्षारकम॔, अत्याधुनिक लेजर व इतर उपचार पद्धती, आयुर्वेदिक औषधे, व उपचार माफक दरात उपलब्ध करून मिळतात." यामाफ॔त आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार व माहिती जास्तीत जास्त लोकांना होणेसाठी विविध उपक्रम राबविले जातात. डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक च्या माध्यमातून उल्लेखनिय "२०८ मूळव्याधी सज॔री केवळ ११ तासाच्या कालावधीत केल्याने त्याची नोंद India Book of Records" मध्येही घेण्यात आली आहे. तसेच ६ शाखा १३ तज्ञ डॉक्टर्स, व विविध उपक्रम,स्थानिक पातळीपासून ते राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार व उपक्रम यात सहभागी होण्याची संधी असा यशाचा चढता आलेख निर्माण करणे शक्य झालेय.. याचे श्रेयही सततचा अभ्यास, या क्षेत्राशी निगडीत अद्ययावत माहिती,तंत्रज्ञान व उपचार पध्दती,उपचार यंत्रणा,यातील इतर तज्ञ व्यक्तींचे माग॔दश॔न व सहकार्य,आमचे सव॔ सहकारी व सर्वात महत्वाचे म्हणजे "अनेक व्याधीग्रस्त व्यक्तींनी दाखविलेला विश्वास" यांनाच द्यावे लागेल. आहेत.

"या डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्या आजारावर योग्य व सर्वोत्तम उपचार मिळेल अशी खात्री एखाद्या व्याधीग्रस्तांना असते." तेंव्हा त्यावर उपचार पध्दतीचे यशापयशही अवलंबून असते. कारण ती खात्री किंवा विश्वास हा त्यांच्या अभ्यासपूर्ण व अनुभवयुक्त ज्ञान यांवर असतो व उपचार करणारे व उपचार घेणारे यातलं "विश्वासाचं नातं" तेथे नकळत तयार होत असतं.आम्ही असचं "विश्वास व खात्रीलायक नातं आजवर जपल्यामुळे कमी कालावधीत १९५०० पेक्षा जास्त रूग्णांना त्यांच्या आजारातून मुक्त करून आनंद व समाधान देवू शकलो याचा आम्हालाही अभिमान वाटतो.यापुढेही अधिकाधिक रुग्णांची सेवा करण्याचा मानस आहे.

"आपल्या महान व संपुण॔ विश्वाला आदश॔वत संस्कृतीचे एक महत्वाचे अंग असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धती व त्याअनुशंघाने आजपर्यंतचा अभ्यास,अनुभव, माहिती या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अन्य तज्ञांचे मार्गदर्शन, इत्यादी विषयांद्वारे आपणांस आमचे अनुभव अभ्यासपूर्ण माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करित आहे.

या उपक्रमाद्वारे देण्यात येणाऱ्या माहितीचा जास्तीत जास्त उपयोग लोकांना "व्याधी व आजार मुक्त,आरोग्यदायी व आनंददायी आयुष्य जगण्यासाठीच" नव्हे तर आयुष्यातील प्रत्येक क्षण आरोग्यदायी व आनंदी आरोग्यासाठी व्हावा हा निखळ हेतू.

आपल्या महान भारतीय संस्कृतीचे एक अंग असणाऱ्या परंतु जगातील अनेक उपचार पद्धतींचा भक्कम पाया व आधार असलेल्या "आयुर्वेदिक उपचार पद्धतींची" माहिती आजच्या पिढीलाही व्हावी हा उद्देश व धेय्य नजरेसमोर ठेवून या ब्लॉगद्वारे आपणांसमोर येत आहोत.....रखे वाटणे

आपला आजपर्यंतचा खात्रीलायक उपचार मिळण्याचा विश्वास व आपलेपणा यांचा प्रवास हा असाच कायम सुरू राहील याचा आम्हालाही विश्वास व साथ॔ अभिमान आहे.आता यापुढे या ब्लॉगद्वारेही भेटत राहूच... !!! जागा दुखणे .