Dr. Kamathe Piles Hospital

Marquee Stop on Hover
Cashless Facility Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

Email us at

info@doctorpile.com

Contact us

+91-8888866185

प्रोक्टोलॉजी मध्ये क्षारकर्म आणि क्षारसूत्र

क्षारकर्म आणि क्षारसूत्र

(इन्ˈडिजनस् अल्कली आणि अल्कलाइन सेटॉन)

क्षारकर्म (इन्ˈडिजनस् अल्कली)

आयुर्वेदीक औषधी वनस्पतींवर अवलंबून जास्त  आहेत. चार वेद – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद – अथर्ववेद या मधून आयुर्वेदाची उत्पती झाली आहे आणि यामध्ये अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे ज्याचा वापर औषधी म्हणून केला जातो. क्षार हे वनस्पतीचा अर्क आहे. क्षार हे एक व एकापेक्षा अधिक वनस्पतीच्या अर्कापासून बनवले जाते. याचा उपयोग हा अनेक उपचारामध्ये व शस्रक्रिया मध्ये केला जातो. क्षारकर्म हे शस्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्राना पर्याय म्हणून शस्रक्रियेला घाबरलेल्या रुग्णांवर सुरक्षितपणे केले जाते. मुळव्याध, फिशर, भगंदर, गळू, पायलोनिडल सायनस इत्यादी अनेक विकारांवर उपचार करण्यासाठी हे प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. क्षारकर्मचा उपयोग हा लहान मुले, कृश व्यक्ती, व जीर्ण व्यक्ती वर करता येतो. आयुर्वेदिक फार्माकोपियामध्ये क्षारकर्म हे संपन्न व प्रभावी शस्राचे उत्तम साधन मानले गेले आहे. सर्जरी चे जनक सुश्रुत यांनी  त्यांच्या सुश्रुतसंहिता या ग्रंथात या उपचारांविषयी सविस्तर माहिती दिली आहे .आयुष, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी या उपचारांना मान्यता दिली आहे.

Indigenous Alkali

क्षार हे वनस्पती किंवा खनिजांपासून मिळणारे अल्कधर्मी कल्क होय. (Alkaline paste) ज्याचा PH हा ९ ते १३.५ पर्यंत असतो .

 

क्षार – (Indigenous alkali) चे महत्व

  • क्षार (Indigenous alkali) हे सर्व शस्र आणि अनुशस्रामध्ये प्रगत असे शास्र आहे.
  • Indigenous alkali हे कुठल्याही धारदार यंत्र व शस्रा पेक्षा सर्वोत्तम आहे, कारण यामध्ये छेदन(Excision), भेदन (incision) , लेखन (scrabbing) व इतर अनुशस्र चे गुणधर्म असतात.
  • क्षारकर्म व क्षारसूत्र हे उपचार मोठ्या सर्जरी साठी एक उत्तम पर्याय आहे.
  • क्षार हे अल्कलाईन असल्याने दुषित टिशू काढण्यास मदत करते .(debridement of unhealthy tissue)
  • क्षारकर्म मुळे किमान उपद्रव होतात , आजार पुन्हा पुन्हा होण्याचे टळते.

मुळव्याधीवर क्षार कर्म उपचार

  • योग्य भुल दिल्यानंतर मुळव्याधीच्या कोबांवर क्षार लावले जाते त्यानंतर ३५  ते ४० सेकंदामध्ये तो काळ्या रंगाचा  होतो यानंतर विनेगार किंवा लिंबाचा रस (सिट्रिक ऍसिड) हे लावले जाते. क्षार हे अल्कली असल्याने त्याला न्यूट्रीलाईज करण्यासाठी ऍसिडच्या स्वरूपामध्ये हे वापरले जाते यामुळे पाईल मास योग्य प्रमाणामध्ये कोमेजला  जातो व हळूहळू नष्ट होतो.
  • अल्कली (क्षार) यामुळे हिमोरोयडल फ्लेक्सेस हे गोठले जातात व पेशी नेक्रोस होऊन हिमोरोयडल फ्लेक्सेस फिब्रोस होऊन, मिकोजल व सबमिकोजल कोट हे चिकटलेले राहतात व यामुळे यामुळे शिरांचे प्रसरण न होता पाईल मास हा नष्ट होतो.

Before

Before alkali apply

Alkali apply

Pile mass become black

Result

क्षार (Indigenous alkali )चे इतर फायदे

  • Indigenous alkali ही खराब झालेल्या जखमांना भरण्यास मदत करते व जंतूंना मारते.
  • क्षारामध्ये तीव्र उर्जा व उष्णता असते .
  • क्षारामुळे जखम ही लवकर सुकते.
  • हार्मोन्स व एनझाइम्स यांच्या निर्मितीसाठी क्षार उपयुक्त आहे.
  • पुय निर्मिती कमी करते.
  • ऑसमॉसिस व कॅपिलरी ॲक्शन वाढवण्यास मदत करते ज्यांच्यामुळे दूषित पेशीचे लिक्विफिकेशनहोते.

क्षार कर्माचे प्रॉक्टोलॉजीमध्ये फायदे

  • क्षारकर्म उपचार पद्धती शास्त्रोक्त आणि सिद्ध आहे.
  • ऑपरेशन नंतर मोठी जखम होत नाही म्हणून यास minimal invasive treatment असे म्हटले जाते.
  • क्षार कर्म ही ऍडमिट न करता केली जाणारी उपचार पद्धती आहे.
  • लोकल भुल देऊन हे ऑपरेशन केले जाते त्यामूळे भुलीचे दुष्परिणाम टाळता येतात.
  • कमी प्रमाणात रक्तस्त्राव होतो .
  • गुद संकुचन ( anal strincture ) होत नाही.
  • पुन्हा उद्भवण्याचा धोका नगण्य असतो.
  • रुग्ण हा त्याच्या दैनंदिन कृती करू शकतो व हे ऑपरेशन माफक दरात करता येते.

क्षारसूत्र

  • क्षारसूत्र ही आयुर्वेदिक उपचार पद्धती भगंदर व पायलोनिडल सायनस मध्ये करतात.
  • या उपचार पद्धतीमध्ये औषधी द्रव्ययुक्त सूत्र वापरले (medicated setone) भगंदर मध्ये बाहेरील ओपनिंग मधून प्रदेशांमध्ये असलेल्या आतल्या ओपनिंग मधून हे काढून बांधले जाते दर आठवड्याला हा थ्रेड बदली केला जातो साधारणता दर आठवड्याला एक सेंटीमीटर एवढा भगंदरचा ट्रॅक्ट हा कट होत जातो व जखम भरत येते. क्षारसूत्र ही उपचार पद्धती भगंदर या आजारासाठी अतिशय सुरक्षित उपचार पद्धती म्हटले जाते यामुळे भगंदर पुन्हा उद्भवण्याचा जो धोका आहे हा अतिशय कमी राहतो याचबरोबर शौचावरील नियंत्रण जाण्याचा धोका या उपचार पद्धतीमध्ये दिसत नाही या उपचार पद्धतीमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये वेदना व ऑपरेशन नंतर होणाऱ्या होणारे जे उपद्रव असतात ते अतिशय नगण्य दिसून येतात.

Alkali Seton

क्षारसूत्र उपचार पद्धतीचे फायदे

  • Minimally invasive: क्षारसूत्र ही उपचार पद्धती अतिशय जुनी व शास्त्रोक्त उपचार पद्धती आहे यामुळे जखम ही अतिशय छोट्या प्रमाणामध्ये होते.
  • Effective for Complex Fistula:

क्षारसूत्र ही उपचार पद्धती कॉम्प्लेक्स फिस्तुला  म्हणजेच एक पेक्षा जास्त असणारे भगंदर यासाठी अतिशय लाभदायक ठरते तसेच काही प्रकारचे भगंदर ज्यामध्ये  इतर उपचार करता येत नाहीत त्यामध्ये क्षारसूत्र ही उपचार पद्धती करता येते.

  • Low recurrence rate:

 इतर उपचार पद्धतीच्या तुलनेत क्षारसूत्र उपचार पद्धतीमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.

  • Preservation of anal function:

 या उपचार पद्धतीचा प्रमुख उद्देश असा की यामध्ये स्फिक्टर मसलला हानी होत नाही, ज्यामुळे गुदभाग हा योग्य प्रकारे कार्य करतो व शौचावरील नियंत्रण जाण्याचा धोका राहत नाही.

  • Reduced hospital Stay:

क्षारसूत्र या उपचार पद्धतीमध्ये हॉस्पिटल मध्ये फार कमी काळ राहण्याची गरज भासते, रिकवरी ही लवकर होते व पेशंटला त्याचे दैनंदिन कामे करता येते.

  • Natural Healing:

क्षारसूत्र यामुळे जखम ही नैसर्गिक पणे भरते व पेशींना बरे होण्यास मदत करते.

  • Cost Effective:

इतर उपचार पद्धतीच्या इतर ऑपरेशनच्या  तुलनेत क्षारसूत्रही उपचार पद्धती अतिशय माफक दरात करता येते.

  • Favourable for high-risk patient:

जे  रुग्ण इतर आरोग्य समस्या असल्यामुळे ( high risk) ऑपरेशन करू शकत नाही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम व सुरक्षित अशी उपचार पद्धती आहे.

  • Minimal Scarring:

इतर उपचार पद्धतीच्या तुलनेत या उपचार पद्धतीमध्ये जखमेची खूण राहत नाही.

 

  • Considerations:

क्षारसूत्र पद्धत उपचार पद्धती ही जरी सुरक्षित मानली जात असली तरी असती तरी ही उपचार पद्धती योग्य आयुर्वेदिक चिकित्सकांद्वारे केले पाहिजे ज्यामुळे चिकित्सक हा वैयक्तिकरित्या बारकाईने लक्ष देऊ शकेल व उपद्रवांपासून बचाव करता येतो.

  • Aftercare:

 उपचारानंतरची काळजी हि महत्त्वाची असते कारण त्यामध्ये आहारविषयक सल्ला, जीवनशैलीतील बदल आणि फॉलो-अप इत्यादींचा समावेश असतो.

  • मुळव्याध आणि भगंदर या आजारांसाठी क्षार कर्म व क्षारसूत्र या अतिशय उत्तम व प्रभावशाली उपचार पद्धती आहेत. क्षारसूत्र व क्षारकर्म या उपचार पद्धतीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारण की या उपचार पद्धती कॉम्प्लेक्स फिस्टुला ,पिलोनिडल सायनस व मुळव्याध यासारख्या आजारांमध्ये सर्वोत्तम मानल्या जातात , कारण ऑपरेशन नंतरची रिकवरी लवकर होते, वेदना व जखमेची कमी खूण फार कमी असते ,कमी काळासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागते,सर्वात महत्वाचे खिशाल परवडणारी व मेडिक्लेम मध्ये होणारे हे ऑपरेशन आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

EN_US
Scroll to Top